अमरावती: नागपूर-अमरावती महामार्गावर नांदगाव पेठ जवळ कंटेनरचा टायर फुटल्याने डिवायडर ओलांडून पलिकडील कंटेनरला जोरदार धडक बसल्याने एक जण जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना आज बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही कंटेनरचे नुकसान झाले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.दुपारी अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
कंटेनरचा टायर फुटला
नागपूरहून अमरावतीकडे कंटेनर जात होता, नांदगाव पेठजवळ वेगात असणारा कंटेनर आला असता कंटेनरचा टायर अचानक फुटला. कंटेनर वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनर डिवायडरवर चढून दुस-या बाजूने येणा-या कंटेनरला समोरासमोर धडक दिली.