36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रनागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले होते. याच दरम्यान तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. मागील तीन वर्षात ६ वेळा त्यांची बदली झाली आहे. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यातच त्यांची बदली झाली आहे. राजकीय नेत्यांशी त्यांचे नेहमीच वाद होत असतात. नागपूर महापालिकेतील वाद तर संपूर्ण महाराष्ट्रातील चर्चेचा विषय होता. त्यांची बदली व्हावी अशी मागणी होत होती. अखेर त्यांची बदली झाली आहे.

  • तुकाराम मुंढे यांची कारकीर्द
  • तुकाराम मुंढे यांची 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषद सीईओ म्हणून नियुक्ती झाली. पहिल्याच दिवशी त्यांनी विविध शाळांना भेटी देत आढावा घेतला आणि गैरहजर असलेल्या शिक्षकांचे निलंबन केले. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्यावर त्यांनी काही डॉक्टरांनाही निलंबीत केले होते.
  • पुढे मुंढे यांची नियुक्ती सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. तेथेही त्यांनी वाळूमाफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. ते पंढरपूर मंदिर समितीचे चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंख्यमंत्री पदावरील व्यक्ती वगळून इतर व्हिआयपी दर्शनाची पद्धत बंद केली.
  • नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावर बदली झाल्यानंतर तिथेही त्यांनी अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. त्यामुळे तेथे त्यांचा आणि राजकीय मंडळीसह इतरांशी संघर्ष झाला. नवी मुंबई पालिकेत त्यांच्यावर अविश्वास ठरावही आणण्यात आला.
  • नवी मुंबई नंतर त्यांची पुणे येथील पीएमपीएमएल अध्यक्ष पदावर बदली झाली. तिथेही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली. पीएमपीएलचा तोटा कमी करुन महसूल वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. परंतू, कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे पुन्हा ते चर्चेत आले. तेथून त्यांची बदली नाशिक येथे करण्यात आली.
  • नाशिक येथे बदली झाल्यावर ते काही काळ तिथे काम करतील अशी आशा असतानाच त्यांची नागपूर मनपा आयुक्त म्हणून बदली झाली. इथेही त्यांच्यात आणि नगरसेवकांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला. अखेर आता पुन्हा एकदा त्यांची मंबई येथील जीवन प्राधीकरण येथे बदली झाली आहे.

तुळजाभवानी मंदिराची नुतन जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या