24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रसात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ

सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.३०(प्रतिनिधी) राज्य शासनाने आज प्रशासनात काही फेरबदल करताना सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.पी फंड यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिनियुक्तीवरून परतलेले वरिष्ठ अधिकारी प्रवीण परदेशी यांची अतिरिक्त मुख्य सचिव मराठी भाषा, या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर रणजित कुमार यांची मुख्य सचिव कार्यालतात नियुक्ती करण्यात आली आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज आशिया यांची जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून, राहुल गुप्ता यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर मनोज जिंदाल यांची जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर, तर मिताली सेठी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉक्टरांवरील हल्ले : एक चिंतन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या