20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्र१४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

१४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३०(प्रतिनिधी) राज्य सरकारने आज आणखी १४ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. निलेश गटणे यांची नांदेड महापालिका आयुक्तपदी, तर जी. एस. पापळकर यांची हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अलीकडेच आयएएस म्हणून बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कौशल्य विकास विभाग, नवी मुंबई येथील आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली मंत्रालयात उद्योग विभागाच्या सहसचिवपदी झाली आहे. तर गोंदिया जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने यांची बदली मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची बदली सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर तर पी. डी. मलिकनेर यांची सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई या यांची सध्या कार्यरत असलेल्या पदावरील नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. सुरेश जाधव यांची नेमणूक कामगार आयुक्तपदी तर प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उपमहासंचालक, यशदा, पुणे येथे झाली आहे.

कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांची नियुक्ती अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे.

एस.जी.देशमुख अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर, एम. देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे येथे झाली आहे.राहुल कर्डिले यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे तर जी. एस. पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.

आकाशाला गवसणी घालणारे व्यक्तिमत्त्व : वैजनाथराव खांडके

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या