24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रदिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून प्रवास केला : शरद पवार

दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून प्रवास केला : शरद पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज सकाळीच ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं. त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक राजकीय नेते, अभिनेते यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्हा दोघांचे एक वेगळेच नाते होते असे म्हणत त्यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहिले तेव्हाचा किस्सा शरद पवार यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, तेव्हा आम्हाला कळाले होते की पुण्यातल्या जेजुरीजवळ दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. ते पाहायला आम्ही सायकलवरुन गेलो होतो. तेव्हा दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहण्याची संधी मिळाली. ते पुढे म्हणाले, पुढे विधीमंडळात, राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप कुमार आणि माझे एक वेगळे नाते निर्माण झाले होते़ माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आग्रह करुन एखादी दुसरी सभा घेण्यासाठी येत असत.

दिलीप कुमार हे फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय होते हे सांगत असताना ते म्हणाले, आम्ही जेव्हा परदेशात त्यांच्यासोबत गेलो होतो. विशेषत: इजिप्त, जपान अशा देशांमध्ये तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. इजिप्तसारख्या देशातही त्यांना पाहण्यासाठी विशेषत: तरुणांची फार गर्दी व्हायची. त्यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती सीमित नव्हती. दिलीप कुमार यांनी भारत पाकिस्तान, भारत चीन अशा युद्धांच्या दरम्यान भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम सहकार्य केले, असेही शरद पवार यांनी सांगितले.

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड; वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या