15.7 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeमहाराष्ट्रतुकाराम मुंढे पुन्हा अधांतरी, जीवन प्राधिकारणावरील नियुक्तीचे आदेश रद्द !

तुकाराम मुंढे पुन्हा अधांतरी, जीवन प्राधिकारणावरील नियुक्तीचे आदेश रद्द !

मनुकुमार श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य गृहसचिव, ई रवींद्रन विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१० (प्रतिनिधी) सर्वपक्षीयांच्या रेट्यानंतर बाहुचर्चित अधिकारी तुकाराम मुंढे यांना नागपूर महापालिका आयुक्‍तपदावरून हटवून मुंबईत बदली करण्यात आली होती. महाराष्‍ट्र जीवन प्राधीकरणाचे सदस्‍य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता हे आदेशही मागे घेण्यात आले आहेत.

मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांना कोणती नवीन जबाबदारी देण्यात येणार हे अदयाप स्‍पष्‍ट झालेले नाही. याशिवाय मनुकुमार श्रीवास्तव यांची गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (अपीले व सुरक्षा) म्हणून, तर ई रवींद्रन यांची विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्‍य सरकारकडून गेल्‍या काही दिवसांत सुरू असणारे आयएएस अधिका-यांच्या बदल्‍यांचे सत्र सुरूच आहे.गुरूवारी देखील आयएएस अधिका-यांच्या बदल्‍या करण्यात आल्‍या आहेत. मनुकुमार श्रीवास्तव यांची गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर ई रवींद्रन यांची विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी नेमणूक झाली आहे. याशिवाय नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले कैलास शिंदे यांची सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

आ.राजूरकरांना पूणे महापालिकेचा दणका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या