नागपूर : नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरकरांचा निरोप घेतला. ‘काही गोष्टी करता आल्या. काही करायच्या होत्या. पण त्यातच बदली झाली. आता नियमानुसार माझ्या मार्गानं निघालो आहे. आपल्यातील ऋणानुबंध असेच कायम ठेवा,’ अशी अपेक्षा त्यांनी नागपूरकरांकडून व्यक्त केली आहे.
मागील सात महिने तुकाराम मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. या काळात त्यांच्या अनेक निर्णयांना राजकीय पक्षांचा विरोध झाला. मात्र, नागरिक त्यांच्या बाजूने उभे राहिले. कोविड काळात सतत फिल्डवर असलेल्या मुंढेंना काही दिवसांपूर्वी करोनाने गाठले होते. ते होम क्वारंटाइन असतानाच त्यांची बदली झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काल ती बदलीही रद्द झाली आहे.
पहा काय म्हणाले तुकाराम मुंढे
नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते. त्याकरिता त्यांना निरोप द्यायला गुरुवारपासूनच त्यांच्या द्वारी रीघ लागलेली होती. कुणी पुष्पगुच्छ आणत होते, कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते तर कुणी त्यांना राखी बांधत होते, तर कुणी काही भेटवस्तूही आणताना दिसत होते.
तुकाराम मुंढेच्या समर्थनार्थ नागपूरकर रस्त्यावर
तुकाराम मुंढेंच्या कामाल नागपूरकारांंची पसंतीच नव्हती तर त्यांच्यावर विश्वास सुद्धा होता. हे या निरोपातून दिसून आलं. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते.
मराठा आरक्षणाच्या भडक्याला सोलापुरातून सुरुवात