24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रतुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांत नागपूर शहरातील नद्याचं रुप पालटलं

तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांत नागपूर शहरातील नद्याचं रुप पालटलं

एकमत ऑनलाईन

नागपूर, 12 जून: नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कठोर प्रशासक म्हणून प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊनचा फायदा घेत तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांत शहरातील नद्याचं रुप पालटलं आहे. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पावसाळ्याआधीच पुनरुज्जीवन केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीची थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहराची जीवनरेखा असलेल्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीचा फायदा करून घेत पावसाळ्याआधीच शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवनाचं काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. मुंढे यांनीच यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे या नद्यांचं जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणं आपलं काम आहे, असंही तुकाराम मुंढे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासोबत मुंढे यांनी एक व्हिडिओ जोडला आहे.

Read More  उस्मानाबादेत कोरोना चिंता वाढली

तुकाराम मुंढे यांच्या ट्वीटला कोट करुन आदित्य ठाकरे यांनी रिट्वीट करून त्यांचं कौतुक केलं आहे. नागपुरातील नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही बांधील होतो आणि आम्ही ते करुन दाखवलं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या