24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र बारावीचा निकाल 15 ते 20 तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत- शिक्षणमंत्री वर्षा...

बारावीचा निकाल 15 ते 20 तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

एकमत ऑनलाईन

मुंबई : बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याची महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  ICSE आणि ISC बोर्डानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची आता विद्यार्थी आणि पालकांना ओढ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची लांबली होती. त्यामुळे दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आयसीएसई (ICSE) आणि सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल देखील लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

Read More  लातूर जिल्ह्यात तब्बल ५९ रुग्णांची वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या