27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रबारावीचा निकाल येत्या तीन दिवसांत?

बारावीचा निकाल येत्या तीन दिवसांत?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बारावीचा निकाल येत्या तीन दिवसांत कधीही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनीही जूनच्या दुस-या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिका-यांनी दिली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील . बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परीक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहतायत.

कोविड पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा झाली होती. यंदाची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. संभ्रमाची स्थितीही होती, पण विद्यार्थी-पालक-शिक्षकांनी बरेच सहकार्य केल्याने ही परीक्षा सुरळीत पार पडली. पेपर तपासणीचे कामही व्यवस्थितपणे पार पडल्याची माहिती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी दिली आहे.

तसेच यंदा परीक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करून शाळा तिथे केंद्र ही सुविधा लागू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचेही गोसावी यांनी सांगितले. कोरोना पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना सुरुवातीला विरोधही झाला होता. मात्र सगळ्या परीक्षा आणि पेपर तपासणी सुरळीत पार पडल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या