22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रदोन डॉक्टरांवर कुत्र्यांचा हल्ला

दोन डॉक्टरांवर कुत्र्यांचा हल्ला

एकमत ऑनलाईन

नागपूर: विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ तेलंगणा येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्ण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडीकल) येथे रेफर केले जातात. मात्र याच ठिकाणी मेडिकलच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस पसरला असून एकाच दिवशी दोन डॉक्टरांवर हल्ला करीत पाय आणि हाताचे लचके तोडल्याची भयंकर घटना मेडिकल परिसरात घडली.

जे डॉक्टर इतरांचा जीव वाचविण्यासाठी तत्पर असतात त्यांनाही वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे कुत्री चावल्यावर या डॉक्टरांना मेडिकलमध्ये इंजेक्शनही मिळू शकले नाही. कुर्त्यांचे दात खोलवर घुसल्याने दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

शेकडो निवासी डॉक्टर रुग्ण सेवेच्या कर्तव्यावर असतात. या डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी शेकडो सुरक्षा रक्षक आहेत. हे रक्षक माणसांपासून वाचवू शकतात पण मोकाट कुत्र्यांपासून कोण वाचवणार? मेडिकल परिसरात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार नागपूर महानगरपालिकेला स्मरण पत्र देऊनही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक येत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या