30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रदोन डॉक्टरांना १० वर्षांची शिक्षा

दोन डॉक्टरांना १० वर्षांची शिक्षा

एकमत ऑनलाईन

पुणे : प्रसूती प्रक्रियेत तज्ज्ञ व सिझेरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नसतानाही महिलेची प्रसूती करीत तिच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दोन डॉक्टरांना न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोघा डॉक्टरांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली. या घटनेत राजश्री अनिल जगताप (वय २२) या विवाहितेचा मृत्यू झाला होता. त्यांनी जन्म दिलेली मुलगी सुरक्षित आहे.

डॉ. जितेंद्र शिंपी (वय ४०) आणि सचिन हरी देशपांडे (वय ३९) अशी शिक्षा झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर भूलतज्ज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.याप्रकरणी राजश्री यांचे पती अनिल जगताप यांनी देहू रोड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. डॉ. शिंपी यांचे किवळे परिसरात अथश्री रुग्णालय आहे. डॉ. सचिन देशपांडे हे तेथे काम करत होते. दोघांचे बीएएमएस शिक्षण झाले असून ते सिझेरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नाहीत.

३० एप्रिल २०१२ रोजी डॉ. शिंपी यांच्या रुग्णालयात राजश्री यांना दाखल करण्यात आले होते. सीझर करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे राजश्री यांची तब्येत बिघडली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना दुस-या रुग्णालयात नेण्यात आले. या काळात मोठा रक्तस्त्राव झाल्याने राजश्री यांचा मृत्यू झाला. डॉक्टर प्रसूती प्रक्रियेत तज्ज्ञ व सिझेरियन आपॅरेशन करण्यास सक्षम नसताना त्यांनी निष्काळजीपणे ऑपरेशन केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. या संवेदनशील खटल्यात सरकारी वकील कावेडिया यांचे न्यायालयाने विशेष कौतुक केले.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या