28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रदोन जहाल नक्षलवादी शरण

दोन जहाल नक्षलवादी शरण

एकमत ऑनलाईन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ६ लाख रुपये बक्षीस असलेल्या २ जहाल माओवाद्यांनी आज पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये जहाल माओवादी अनिल उर्फ रामसाय आणि रोशनी इरये या दोघांचा समावेश आहे. अनिलने कसनसुर दलममध्ये काम केले. अनिलवर ४ लाखाचे तर रोशनीवर २ लाखाचे बक्षीस आहे. त्याने आज आत्मसमर्पण केल्याने नक्षल्यांना धक्का बसला आहे.

अनिल पोलिस दलावर भूसुरंगस्फोटाद्वारे आणि गोळीबार करून हल्ला करणे, अशा गंभीर घटनांमध्ये तो सहभागी होता. अनिलने केलेल्या दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये एक जवान शहीद तर दहा जवान जखमी झाले होते, तर रोशनी उर्फ इरयीने दलम सदस्य ते एसीएम आणि उपकमांडर पदावर काम केले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यासह पोलिस दलावर हल्ल्याच्या काही गंभीर घटनांमध्ये तिचा समावेश होता. अनिलवर चार लाखाचे तर रोशनीवर दोन लाखाचे बक्षीस आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या