ठाणे : ठाण्याच्या नौपाडा परिसरात इमारतीच्या पायाभरणीदरम्यान मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगा-यात अडकल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर एक जण जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा येथील बी-केबिन परिसरात एका इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. रात्री आठ वाजेच्या सुमारास मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने तीन कामगार ढिगा-याखाली अडकले. या पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.