कोल्हापूर : कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागली आहे. या आगीत दोन रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अतिगंभीर 15 रुग्णांवर उपचार सुरू होते.
ही आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांनी इथल्या कोरोना रुग्णांना अपघात विभागात हलवलं. मात्र यात या घटनेचेमहाराष्ट्र सुरक्षा बलाच्या 2 कर्मचाऱ्यांना इजा झाल्याच प्रत्यक्षदर्शीनी सांगितल आहे.
या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं सांगितल आहे.
नेहमी वर्दळ असलेल्या या रुग्णालयातील एका महत्त्वाच्या विभागाला अशा पद्धतीने आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सिपीआरला भेट देत माहिती घेतली.
कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय