24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या

रायगडमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या

एकमत ऑनलाईन

हरिहरेश्वर : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअ‍ॅलर्ट जारी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ही बोट किना-यावर आणण्यात आली. पण ही बोट नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यांपैकी एका बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे पण हे लोक नेमके कोण आहेत हे समजू शकलेले नाही, अनिकेत तटकरे यांनी ही माहिती दिली.

तातडीने तपास व्हावा : तटकरे
खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असल्याची बोट सापडली आहे. काही लाईफ जॅकेट्सही या परिसरात सापडले आहेत. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, या घटनेचा तातडीने सर्व यंत्रणांच्या मार्फत तपास व्हायला हवा. त्याचबरोबर अशाच पद्धतीची घातक शस्त्रे आपल्या किनारपट्टीवर येऊ नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना यापूर्वी केल्या होत्या, काही यंत्रणा उभी केली होती. त्यांचे यामध्ये अपयश आहे का? याची चौकशी करण्यात यावी. कारण या बोटी भरकटून किनारपट्टीवर आली की काय हे देखील तपासातून पुढे येईल.

२४ तासांत सुगावा लागणार?
रायगडच्या जनतेने विचलीत होऊ नये, अशी विनंती त्यांना करतो. चोवीस तासात याबाबतीतले सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या दहशतवादविरोधी पथकाने या घटनेची सूत्र तातडीने हातात घेणे गरजेचे आहे. कारण ही सर्व रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी सगळे सुरक्षेच्या यंत्रणांनी हा तपास करणे गरजेचे आहे असेही पुढे सुनील तटकरे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या