अमरावती : अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गावरील खड्डा वाचविताना हा अपघात झाला. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. त्यामुळे तब्बल ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोखंडी गज (बार) घेऊन ही ट्रक जात होती. मात्र, नागपूर-औरंगाबाद महामार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकविताना हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रकमधील लोखंडी सळई ट्रकमधील प्रवाशांच्या शरीरात आरपार घुसली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर चालकाच्या शरीरात लोखंडी गज शिरून त्याचा मृतदेह केबिनची काच तोडून बाहेर आल्याचे दिसले.