29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रकटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर तर सातारचा दुसरा खासदार शेतात!

कटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर तर सातारचा दुसरा खासदार शेतात!

एकमत ऑनलाईन

सातारा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमध्येही साता-यात मात्र दोन खासदारांच्या दोन त-हा पाहायला मिळत आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साता-यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले.

हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर आंदोलन करत होते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा वेळ शेतीची कामे उरकण्यासाठी सत्कारणी लावला. वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी लोक श्रीनिवास पाटील यांना भेटायला येणार नाहीत. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च्या शेतात गहू काढणीचे काम हाती घेतले. त्यानंतर साता-यातील दोन खासदारांच्या दोन त-हांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला यापूर्वीच पूर्णपणे विरोध दर्शविला होता. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले होते.

सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. व्यापा-यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापा-यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापा-यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

हृदयविकार, कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रुग्णाचे मृत्यू अधिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या