31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! -...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची पात्रता नाही. असा मुख्यमंत्री होणं हे म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी आज केली. सुशांतसिंह राजपूतचा खूनच झाला असून एक मंत्री पण गजाआड जाईल,असा दावा त्यांनी केला. तर भाजपाच्या आशिष शेलार यांनी, देश चालवण्याचे सोडा, आधी मुंबई चालवून दाखवा, असे आव्हान दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात बोलताना भाजपावर खरपूस व जळजळीत टीका केली होती. या टीकेला आज भाजपकडून तेवढेच तिखट उत्तर देण्यात आले. भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही.बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलंबाहे. शिवसेनेचे ५६ आमदार केवळ नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आले आहेत. युती नसती तर २५ सुद्धा निवडून आले नसते. असा माझा आरोप आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली. भाजप, पंतप्रधान मोदी किंवा राणे कुटुंबियांबद्दल जर परत टिका केली तर ३९ वर्षांत जे काही शिवसेना, मातोश्रीत पाहिलेय ते सर्व बाहेर काढेन असा इशारा राणे यांनी यावेळी दिला.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे वर्षभरात केलेल्‍या कामाचा लेखाजोखा देतील अशी अपेक्षा होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली. मुळात ते या पदावर बसण्याची त्यांची पात्रता नाही. त्‍यांचे स्‍वतःचे कर्तुत्‍व शून्य आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्‍यांनी देखील त्‍यांना मुख्यमंत्री होउ दिले नसते. स्‍वतःला वाघ म्हणवणारे कोरोना काळात घराच्या बाहेरही पडले नाहीत. ते पिंज-यातला वाघ आहेत का ? असा टोलाही राणे यांनी लगावला.

सुशांतसिंह प्रकरणात मंत्रीपुत्र गजाआड जातील !
दसरा मेळाव्यात उदधव ठाकरे यांनी आदित्‍यला क्‍लीनचिट देण्याचा प्रयत्‍न केला. मात्र अजून या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सुशांतसिंहने आत्महत्या केलेली नाही, तर त्याचा खूनच झाला आहे. याला जबाबदार असणारे सर्व जण गजाआड जाणार आहेत. त्‍यात एक मंत्री आहे जो त्‍यांचा मुलगा आहे असा दावाही नारायण राणे यांनी केला. सत्तेचा वापर करून स्‍वतःच्या मुलाला वाचविण्याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे.मात्र लवकरच सुशांतला कोणी मारले,कसे मारले हे कळणार आहे.दिशा सालियनचा देखील बलात्‍कार कोणी केला,तिला वरून कोणी खाली फेकले हे देखील बाहेर येईल, असा इशाराही राणे यांनी दिला.

आशिष शेलार यांचाही हल्लाबोल !
नारायण राणे यांच्याआधी मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी मंत्री आशिष शेलार यांनीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना त्यांची सत्ता टिकेल याविषयी शंका आहे. त्यामुळेच ते एकसारखे सरकार पाडून दाखवा अशी ओरड करतात. पण आमच्या नेत्यांनी आधीच सांगितले आहे की, हिंमत असेल तर सरकार चालवून दाखवा. पण आता तर हिंमत असेल तर बाहेर उतरून दाखवा असे म्हणायची वेळ आली आहे. धर्माच्या नावाखाली सरकार पाडण्याचा प्रयत्न असा आता नविन आरोप केला जातो. पण जे सरकार कर्माने पडणार आहे ते धर्माने पाडायची गरजच काय ? असा सवाल शेलार यांनी केला.

कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या काळाता कोरोनायुध्दोचा सन्मान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यात आल्या. मात्र त्यांचा हिंदूत्वाशी चुकीचा संदर्भ लावणे म्हणजे दुर्भाग्य आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचे नाही, तर काय घरात बसून अंडी उबवायची का ? असा खोचक सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रावर जेव्हा अतिवृष्टी, चक्रिवादळ, पूराचे संकट आलेले तेव्हा मुख्यमंत्री कुठे गेले होते असा प्रश्न आज उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारत आहे. पंतप्रधान मोदींना देश सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्यांनी स्वत:चे राज्य तर नाहीच मुंबई तरी सांभाळून दाखवा असे आव्हान शेलार यांनी दिले.

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या