29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत

उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

अमरावतीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे? हे मला वेगळे सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचे काय करायचे, हे मी सकाळीच सांगितले आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. त्यांच्याविरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजेत असेही ते म्हणालेत. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

अमरावतीत संतोष बांगर यांच्यावर गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावरून दिसत आहे ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत असे दिसत आहे. त्यांना फटकेच द्यायला पाहिजेत. त्यांना त्यांच्या भाषेत बोलले पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळतच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावे असा धमकीवजा इशाराही निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या