अमरावती : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आज २६ आणि २७जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी या मुलाखतीवर जोरदार टीका केलीय. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्ंिसग मॅच असल्याचे त्यांनी म्हटले आहे . राणा पुढे म्हणाले, मुलाखतीत संजय राऊत यांचेच प्रश्न असून उद्धव ठाकरेंनी उत्तर काय द्यायचे हे ही राऊतांनीच आधीच ठरवलेले आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊतांची कटपुतली झाले आहेत.
परंतु, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये. कारण, शिंदे गटाचीच खरी शिवसेना आहे, अशी टीका त्यांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्धव ठाकरेंचे उरलेले अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली असल्याचा आरोपही रवी राणांनी केलाय.