24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपुढील पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री

पुढील पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील नेत्यांनी गाठीभेटी आणि दौरे यावर भर दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असे साकडे घातले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार का? यावर गृहमंत्र्यांकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?, असा सवाल दिलीप वळसे-पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, मुख्यमंत्रीबदलाची कोणतीही चर्चा महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू नाही. पुढील पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीबदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हनुमान जन्मस्थळ वादासंदर्भात विचारले असता गृहमंत्री म्हणाले, हे सगळे ठरवून चालले आहे. जो विषय आवश्यक नाही असे विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे. रामजन्म, हनुमानाचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचे विषय नसून वाढती महागाई हा गंभीर विषय आहे. मात्र असे विषय समोर आणून लोकांचे लक्ष हटवण्याचे काम सुरू आहे. हनुमान जन्म कुठे झाला हा वाद अनावश्यक असल्याने त्याला महत्त्व देऊ नये. आम्ही लक्ष ठेवू त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या