23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे देणार नाहीत आमदारकीचा राजीनामा!

उद्धव ठाकरे देणार नाहीत आमदारकीचा राजीनामा!

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. पण ठाकरेंनी प्रत्यक्षात विधान परिषदेच्या सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आता उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ कमी होऊ नये, म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारिणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना विधान परिषद आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामापत्र दिले होते. मात्र विधान परिषद सदस्याचा राजीनामा विधान परिषद सभापतींकडे द्यावा लागतो. त्यामुळे ठाकरे यांचा राजीनामा ग्रा धरला गेला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषद आमदार म्हणून कार्यरत आहेत. विधानपरिषदेच्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला. या बंडाविरोधात उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी विधान परिषदेची आमदारकी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात ते विधान परिषदेत हजेरी लावून पुन्हा ते सभागृहात ठाकरी बाणा दाखवून देऊ शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या