25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी, मदत कधी मिळते हे त्यांना माहिती नाही

उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी, मदत कधी मिळते हे त्यांना माहिती नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सध्याच्या सरकारवर टीका केली होती. यानंतर शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

औरंगाबादचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सरकारला खडसावलं होतं. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत का मिळत नाही? असा सवाल करून त्यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर रामदास कदम यांनी “उद्धव ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे, त्यांना साध्या गोष्टी कळत नाहीत” असा टोला लावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, त्यांना माहिती पाहिजे की पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करता येत नाहीत. आणि पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही हे त्यांना माहिती पाहिजे, त्यांना हे माहिती असतं तर त्यांनी अशी टीका केली नसती, मला असं वाटतंय की, त्यांचा अभ्यास कमी आहे” असं रामदास कदम म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावरचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमींवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या