24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हे हत्याकांड; सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

उमेश कोल्हे हत्याकांड; सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावती येथे केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एनआयएने आज उमेश कोल्हे हत्याकांडातील सात आरोपींना अमरावती येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली होती.

उदयपूरच्या कन्हैयालाल याच्या हत्येनंतर २१ जून रोजी अमरावतीमध्ये ५४ वर्षीय उमेश कोल्हे यांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती. कारण होते नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांच्याकडून करण्यात आलेली पोस्ट. उमेशचा मुलगा संकेत कोल्हे यांने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी २३ जून रोजी मुदस्सीर अहमद (२२) आणि शाहरुख पठाण (२५) या दोघांना अटक केली. दोघांची चौकशी केल्यानंतर हत्येत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. उर्वरित आरोपी अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) आणि शमीम फिरोज अहमद यांनाही अटक करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या