25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हे हत्याकांड; सात आरोपींना १५ जुलैपर्यंत एनआयए कोठडी

उमेश कोल्हे हत्याकांड; सात आरोपींना १५ जुलैपर्यंत एनआयए कोठडी

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावती हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या सात जणांना मुंबई न्यायालयाने १५ जुलैपर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. यापूर्वी सर्व आरोपींना पूर्व महाराष्ट्रातील अमरावती शहरातून मुंबईत आणण्यात आले होते.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याने अमरावतीमध्ये केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री दुकानातून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती.

भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये पोस्ट शेअर केल्याबद्दल उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सुरुवातीला केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या