24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास एनआयएकडे

उमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास एनआयएकडे

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावतीमध्ये उदयपूरसारखी हत्या झाल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. गेल्या २१ जून रोजी अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, असा दावा खासदार बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे.

या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचे पथक अमरावतीत दाखल झाले आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली असली तरी या हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. अशातच, एटीएस याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

महाराष्ट्र एटीएसचे पथक अमरावतीमध्ये या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एटीएसच्या सूत्रांनी सांगितलं की, ते या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध आहे का? याचा तपास करत आहे. उदयपूरच्या आरोपींप्रमाणे अमरावतीच्या आरोपींनीही हाच नमुना वापरला आहे का, याचा तपास एटीएस करत आहे. तपास अजूनही स्थानिक पोलिसांकडे आहे, पण एटीएस समांतर तपास करत आहे. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र एटीएसचे पथक गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या