22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हेंची हत्या नूपूर समर्थनामुळेच : पोलिस आयुक्त आरती सिंह

उमेश कोल्हेंची हत्या नूपूर समर्थनामुळेच : पोलिस आयुक्त आरती सिंह

एकमत ऑनलाईन

मुंबई : अमरावती हत्याकांडात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे खून प्रकरण हे मुहम्मद पैगंबर वादाशी संबंधित असल्याचा खुलासा पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी केला आहे. स्थानिक भाजप युनिटच्या सदस्यांनी पोलिसांवर हत्येमागील खरी कारणे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हत्येच्या सुमारे १० दिवसांनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चॅनलवर मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर देशातील आणि जगभरातील मुस्लिमांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अमरावतीमध्ये हत्या झालेल्या केमिस्ट उमेश कोल्हेंनी नुपूर शर्माला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे आरती सिंह यांनी सांगितले. ही बाब आधीच माहित होती, पण या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत खुलासा केला नाही, असही त्यांनी सांगितले. मारेकऱ्यांकडे प्रत्येकी १० हजार रुपये आणि एक दुचाकी मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी आरोप केला होता की, हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यापर्यंत पोलिस सुस्तपणे वागत राहिले. मात्र पोलीस आयुक्तांनी हा आरोप फेटाळून लावला. तसेच खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या पोलिसांवर खोटे आरोप करत असल्याचं आरती सिंह यांनी म्हटले आहे.

दरम्यान ५४ वर्षीय उमेश कोल्हे हे घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चाकूने वार केले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये आठवडाभरापूर्वी अशाच हत्याकांडाची ही गोष्ट आहे. या प्रकरणी आतापर्यंत या घटनेचा कथित सूत्रधार इरफान शेख रहीमसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. इरफान शेखने ५ मारेकऱ्यांना पैसे आणि बाईक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या