24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रअनपेक्षित, अनाकलनीय निकाल

अनपेक्षित, अनाकलनीय निकाल

एकमत ऑनलाईन

नाशिक : आमच्यासाठी अनपेक्षित निकाल असून असा निकाल लागेल असे डोक्यातही नव्हते, मतदान सरळ झालं मात्र मतांची गडबड झाल्याचे प्रतिक्रिया पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. नाशिक दौ-यावर असताना त्यांनीप्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभेचा निवडणूक निकाल लागला असून यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. यामुळे शिवसेनेला हा पराभव जिव्हारी लागला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाणी पुरवठा निकालाचे विश्लेषण करताना अनेक बाजूंना स्पष्ट करून त्यांनी निकालाबाबतची आपली भूमिका मांडली.

तसेच २० तारखेला विधान परिषद निवडणूक होत आहे, त्यामध्ये ही दुरुस्ती करण्याची गरज आहे. आज आपण पाहिले असेल की थोडासा निसटता पराभव झाल्यामुळे जवळपास दहा मतांचा फरक दिसतोय आणि याला सरकारसह आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेले आहे. पुढच्या काळामध्ये यात दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करू.

निकाल चिंताजनक
निकालावरून वाटत नाही की आमचा पराभव झाला आहे. हरलो तर हरलो. हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक असून चिंताजनकही आहे. महाविकास आघाडी यावर निश्चित विचार करणार आहे. मात्र पराजय झाला आहे, यावर चिंतन करणे आवश्यक आहे.

आगामी रणनीतीसाठी तयारी
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत. भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बोलवले आहे. पुढची रणनीती ते ठरवतील त्या पद्धतीने काम करू, असे पाटील यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या