23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रइंधन दरवाढीविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

एकमत ऑनलाईन

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महागाई उच्चांक गाठत असून यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादीने महागाईविरोधात अनोखे आंदोलन केले आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केले असून महिलांना चूल आणि लाकूड देऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाई कमी झाली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी उपस्थित उज्ज्वलांना चूल व लाकूड भेट देत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

एकीकडे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दुसरीकडे सातत्याने
जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल, भाजीपाला आदींच्या किमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. परिणामी सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशातच गॅस दरवाढीमुळे महिलांना पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

राष्ट्रवादीने यावेळी आंदोलनात सहभागी महिलांना चूल व लाकूड देत महागाईचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकार हाय हाय, महागाई कमी झालीच पाहिजे यासारख्या घोषणांनी सरकारला जाब विचारण्यात आला. महागाईविरोधात राष्ट्रवादीकडून वारंवार आंदोलन केले जात असताना अद्यापही केंद्र सरकारला जाग येत नाही. मग महागाई थांबणार कधी? असा सवाल यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला आहे.
घरगुती गॅस महागला!
सर्वसामान्यांना लागणा-या जीवनावश्यक वस्तूंमधील गॅसही महागला असून गृहिणींचे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठी वापरल्या जाणा-या एलपीजी गॅसचे दर वाढवण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या