25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्र‘यूपीएससी यशस्वितांचा कोथरूड येथे सत्कार सोहळा

‘यूपीएससी यशस्वितांचा कोथरूड येथे सत्कार सोहळा

एकमत ऑनलाईन

पुणे : एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा २०२०-२१ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा १३वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळा दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.०० वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभामंडपामध्ये होणार आहे. या समारंभासाठी आयएफएस (सेवानिवृत्त)

भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा, राज्यसभेचे माजी महासचिव व राज्यसभा सचिवालयाचे सल्लागार डॉ. पी. पी. के. रामचार्युलू, (निवृत्त आयपीएस), भारताच्या गृहमंत्रालयाच्या नॅशनल क्राईम ब्युरोचे संचालक पवार व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माजी अध्यक्ष व प्रख्यात वकील श्रीमती मंजुला दास हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्­वनाथ दा. कराड हे असतील.

तसेच, या परीक्षेत भारतातून तिसरी आलेली गामिनी सिंगला हिचा सत्कार करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपयांचे पारितोषिक तसेच शाल व श्रीफळ देण्यात येणार आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्­वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्याचा समारोप सोमवार, दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्­लेषण संस्था (एमपी आयडीएसए) चे उपमहासंचालक व एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त) मेजर जनरल (डॉ.) बिपीन बक्षी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या प्रसंगी भारतातील यूपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणे तर्फे सामाजिक बांधीलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे. अधिक माहितीसाठी ६६६.े्र३६स्र४.ी४ि.्रल्ल या वेबसाईटवर संपर्क साधता येईल.

अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. शालिनी शर्मा, स्कूल ऑफ सस्टेनेबल स्टडीजच्या संचालिका प्रा. अनामिका विश्­वास, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संचालक डॉ. के. गिरीसन आणि सामाजिक उपक्रमाचे संचालक डॉ. महेश थोरवे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या