32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर

एकमत ऑनलाईन

राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी स्वतः फोनवरुन चर्चा केली होती. दरम्यान उर्मिला यांनी शिवसेनेला होकार दिला आहे.

उर्मिला मातोंडकरने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगना राणौतला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कंगनाचा सामना करण्यासाठी उर्मिलाला शिवसेनेने विधान परिषदसाठी आमदारकीची ऑफर दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वी उर्मिला मातोंडकरने मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मातोंडकर यांना भाजपच्या गोपाल शेट्टी यांनी हरवलं होतं. मात्र सहा महिन्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी ६ महिन्यानंतर काँग्रेसमधून अंतर्गत गटबाजीच्या कारणावरुन राजीनामा दिला होता.

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडी सरकारने 12 जणांच्या नावांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केलीये. यामध्ये एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आलीये.

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या