18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रदूधवाढीसाठी बेकायदा औषधांचा वापर!

दूधवाढीसाठी बेकायदा औषधांचा वापर!

एकमत ऑनलाईन

पुणे : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे दिल्या जाणा-या औषधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून, हे मानवासोबतच जनावरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे दूध अमृत बनण्याऐवजी विष तर बनणार नाही ना, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मानवी विकृती सर्वांनाच माहीत आहे. परंतु ती जर मानवी मुळावर उठत असेल, तर यापेक्षा धक्कादायक काय असू शकते, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला असून, तब्बल ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक आणि औषध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. समीर अन्वर कुरेशी (२९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशू जाना (४४, रा. पुरबा बार, विलासपूर, पुरबा मदिनापूर, पश्­िचम बंगाल), मंगल कनललाल गिरी (२७, तिराईपूर, पश्­िचम बंगाल), सत्यजीत महेशचंद्र मोन्डल (२२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्­िचम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (३२, रा. नलपूरकूर, मंडाल, पश्­िचम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत गाई, म्हशीच्या दुधात वाढ होण्यासाठी ऑक्­िसटॉसिनचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू होता. मुळातच या औषधाचा वापर बेकायदा आहे.

त्यापेक्षाही या बेकायदेशीर औषधीचा साठा पुण्यात गोळा करून ठेवला होता. औषधाचा बेकायदा साठा असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकास मिळताच या पथकाने एफडीएच्या अधिका-यांना याबाबतची माहिती दिली. त्यावरून छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. जनावरांध्ये दूध वाढीसाठी हे औषध दिले जात असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. आपण दूध हे अमृत म्हणून पितो. परंतु व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त दूध मिळावे, या उद्देशाने औषधीचा वापर करणे गैर असून, हे जनावरांसोबत माणसांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला होता साठा
पत्र्याच्या शेडमध्ये काही पुठ्यांच्या खोक्यात हा औषधांचा साठा केला आहे, अशी माहिती उघडकीस आली होती. या सगळ््याची माहिती मिळताच शनिवारी लोहगावमधील कलवड वस्ती येथे छापा टाकून लाखोंचा माल जप्त केला. ही धक्कादायक बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

औषध विक्रेते म्हणून केली होती विक्री
पाचही जणांची टोळी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधून आलेली होती. काही दिवसांपासून ही टोळी पुण्यात वास्तव्यास होती. या टोळीने औषध विक्रेता असल्याचे सांगत अनेकांना औषध विकले होते. फसवणूक, प्राण्यांना अमानुष वागणूक देणे, अशा अनेक कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. टोळीने नेमके कोणा-कोणाला औषध विकले आहेत, याचा तपास सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या