28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षेत वायफाय राऊटरचा वापर; उमेदवारावर कायमस्वरुपी बंदी!

एमपीएससी परीक्षेत वायफाय राऊटरचा वापर; उमेदवारावर कायमस्वरुपी बंदी!

एकमत ऑनलाईन

सातारा : एमपीएससीच्या परीक्षेत एका उमेदवारानं स्मार्टफोन्स आणि वायफाय राऊटर वापरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराला या परीक्षेतून बाद करत त्याच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे.

अजित भुजंगराव शिंदे असं गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ दरम्यान सातारा जिल्ह्यातील क. भा. पाटील पॉलिटेक्निक कॉलेज या केंद्रावर त्यानं स्वत:जवळ स्मार्टफोन आणि वायफाय राऊटर बाळगला होता. गैरप्रक्रार करणाऱ्या या उमेदवाराची संबंधीत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात आली असून त्याच्यावर कायमस्वरुपी बंदीही घालण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या