मुंबई : राज ठाकरे यांच्या सभेनंतर राजकीय वातावरण तापलेले असताना आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
पण या भुंग्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आम्हाला. कारण ते नुसतेच आवाज करणारे भुंगे आहेत. आमचा फोकस आहे तो म्हणजे राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा. एवढे भुंगे भुणभुण करतायत म्हणजेच उत्तरसभा चांगलीच झोंबलेली आहे , असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. या काळातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. ज्यात अमेय खोपकर यांनी राऊतांना टोला लगावला होता.