30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home औरंगाबाद औरंगाबादेत लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू

औरंगाबादेत लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आला आहे. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबादेतील एका पोलिसाने आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, अखेर उपचारादरम्यान त्या पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला. भास्कर शंकर मेटे हे पोलिस हवालदार बेगमपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

वाळू मफियांविरूध्द महसूल विभागाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या