22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्र१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१२ (प्रतिनिधी) लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण काही काळासाठी थांबवण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ४५ वर्षांवरील लोकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्‍याचे आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. लॉकडाउनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी, काही जिल्ह्यातील स्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे सूतोवाच आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषित करतील असे त्यांनी सांगितले.

राज्‍यमंत्रीमंडळाची बैठक बुधवारी मंत्रालयात झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी १८ ते ४४ पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्तास स्‍थगिती देण्यात येत असल्याची माहिती दिली. राज्‍यात कोव्हीशिल्‍ड आणि कोव्हॅक्‍सिन मिळून २० लाख लोकांना मुदतीत दुसरा डोस देणे आवश्यक आहे. मात्र सध्या आपल्याकडे केवळ १० लाख डोस उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे १८ ते ४४ पर्यंतच्या नागरिकांसाठी खरेदी केलेल्‍या लसी या ४५ वरच्या वयोगटातील नागरिकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यावर १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू केले जाईल.

मात्र सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. २० मे नंतर दर महिन्याला लसींचे दीड कोटी डोस आपण पुरवू शकू, असे त्यांनी सांगितले आहे. त्‍यामुळे सध्या तरी प्राधान्य ४५ वरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठीच असणार आहे.त्‍यानंतर उपलब्‍धतेनुसार लसीकरण करण्यात येईल,असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्‍यातील लसीकरणाबाबतची सध्यस्‍थिती व लसीच्या पुरेशा पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असल्‍याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. मिशन ऑक्‍सीजन संदर्भात ऑक्‍सीजन निर्मात्‍या उदयोगांना विविध सवलती राज्‍य सरकारकडून देण्यात येणार असल्‍याचेटोपे यांनी सांगितले.

लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढणार
राज्यातील लॉकडाऊनची मुदत १५ मे रोजी संपत आहे. ही मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवली जाईल असे सूतोवाच टोपे यांनी यावेळी केले. राज्‍यात लॉकडाउन लावण्याआधी सक्रिय रूग्‍णांची संख्या ७ लाखापर्यंत पोहोचली होती.बमात्र लॉकडाउननंतर आता ती ४ लाख ७५ हजारापर्यंत खाली आली आहे. देशाचा रूग्‍णवाढीचा दर १.४ आहे तर राज्‍याचा ०.८ पर्यंत आहे. देशातील ३६ राज्‍यांच्या यादीत रुग्णवाढीत महाराष्‍ट्र ३० व्या क्रमांकावर आहे. निर्बंधांचे निश्चितच सकारात्‍मक परिणाम दिसून आले आहेत. आज राज्‍यमंत्रीमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध अधिक वाढवावेत असेच मत व्यक्‍त केले आहे. त्‍यामुळे निर्बंध ३१ मे पर्यंत वाढतील, मात्र याबाबतची अंतिम घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच करतील असेही टोपे यांनी स्‍पष्‍ट केले.१५ मे नंतरच्या निर्बंधांबाबतची मार्गदर्शक सूचना येत्‍या दोन तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल असेही त्‍यांनी सांगितले.

नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या