31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeमहाराष्ट्रवंदे मातरम्, राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

वंदे मातरम्, राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम् व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी ११.५५ वाजता कामकाजास सुरुवात झाली.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझाङ्घ’ या राज्यगीताने सभागृह दुमदुमले होते.

स्वातंर्त्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीतास राज्य गीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कवी राजा बडे यांनी लिहिलेले ‘जय जय महाराष्ट्र माझाङ्घ’ हे गीत सीमा आंदोलनाच्यावेळी मराठी मनाला प्रेरणा देणारे ठरले होते. या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले असून, हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.

विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे,यांच्यासह सन्माननीय मंत्री, विधानसभा सदस्य उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या