31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रवर्षा राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स

वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. तर आता पुन्हा वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले असून, ११ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी त्यांची तीन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी करण्यात आली होती. वर्षा राऊत यांना ईडीकडून ५ जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले आहे.

लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींपैकी २५ बिनविरोध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या