24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रवेदांत-फॉक्सकॉन; आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी तळेगावला आंदोलन !

वेदांत-फॉक्सकॉन; आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी तळेगावला आंदोलन !

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने असून, राज्यभर जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी स्वत: आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरणार असून शनिवारी पुण्यातील तळेगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष व बोटचेप्या धोरणामुळे वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या प्रकल्पानंतर बल्कड्रग पार्क देखील बाहेर गेले. यामुळे महाराष्ट्राला मिळणारा मोठया प्रमाणातील रोजगार बाहेर गेला. प्रकल्प बाहेर गेल्याने १.५४ लाख कोटींची गुंतवणूक तर महाराष्ट्राने गमावलीच पण १ लाख रोजगार देखील आपण गमावले असा आदित्य ठाकरे यांचा आरोप आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने यासाठी आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारला जबाबदार धरले असले तरी, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी अत्यंत आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे. पत्रकार परिषदांमधून आरोपांची राळ उडवल्यानंतर आता स्वत: आदित्य ठाकरे वेदांत प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. युवासेनेच्या माध्यमातून राज्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी पुण्यातील तळेगाव येथे आदित्य ठाकरे हे जनआक्रोश आंदोलन करतील. तळेगावमध्ये हा प्रकल्प येणार होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या