22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home महाराष्ट्र ईडीच्या चौकशीसाठी विहंग सरनाईक गैरहजर

ईडीच्या चौकशीसाठी विहंग सरनाईक गैरहजर

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या अधिका-यांनी धाड टाकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वारंवार चौकशी सुरू आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजी विहंग सरनाईक चौकशीसाठी गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. विहंग याला ईडी अधिका-यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगीतले होते़ पण तो गेलाच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीने समन्सद्वारे विहंगला चौकशीसाठी येण्यास सांगितले होते़ पण तरीदेखील तो गैरहजर राहिला. महत्त्वाचे म्हणजे विहंग याला आतापर्यंत अनेकवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. सोमवारी त्याला चौथा समन्स बजावण्यात आला होता. यानुसार आज १ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत त्याला हजर राहायला सांगण्यात आले होते़ पण विहंग चौथ्या समन्सनंतरही ईडी कार्यलयात हजर झाला नाही. यामुळे आता ईडी विहंग याच्यावर कडक कारवाई करण्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरंतर, टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे. प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यालाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यात प्रताप सरनाईक यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. पण तरीही विहंग सरनाईक चौकशीसाठी गैरहजर राहिला.

तहव्वूर राणा प्रत्यार्पणाचा खटला अमेरिकेत सुरू होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या