23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजन‘विक्रम’ची ४०० कोटींची कमाई!

‘विक्रम’ची ४०० कोटींची कमाई!

एकमत ऑनलाईन

मुंबई : टॉलिवूडचा दिग्दर्शक लोकेश कनगराज याच्याबाबत असे म्हटले जाते की, त्याने आतापर्यंत जे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत त्यापैकी एकही फ्लॉप झालेला नाही. यावरून त्याची ओळख आपल्याला होते. सध्याच्या घडीला भारतातील सर्वांत प्रभावी दिग्दर्शक म्हणून त्याचे नाव घेतले जाते.

लोकेशच्या ‘विक्रम’ नावाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने नुकताच ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. कमल हसन, विजय सेतूपतीसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘विक्रम’ने बॉलिवूडच्या चित्रपटांना नाकीनऊ आणल्याचे दिसून आले आहे.

‘विक्रम’समोर अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे दिसून आले. ‘सम्राट पृथ्वीराज’चे बजेटच ३०० कोटी होते. त्याच्या मागे यशराज बॅनर होता. करण जोहरला आपला हा चित्रपट फ्लॉप झाल्याने मोठा धक्का बसला आहे. याशिवाय ‘पृथ्वीराज’च्या दिग्दर्शकांनी अक्षयवर फ्लॉप झाल्याचा राग व्यक्त केला आहे. त्याच्याऐवजी दुस-या अभिनेत्याला मी कास्ट करणे गरजेचे होते.

असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. या सगळ्यात ‘विक्रम’ने जगभरातून मोठी कमाई केल्याचे आकडे समोर आले आहेत. ‘विक्रम’ने भारतातून २८४ कोटींची कमाई केली असून १२० कोटींची कमाई परदेशातून केल्याचे सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या