18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार

ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार

एकमत ऑनलाईन

सांगली : आद्य नाटककार विष्णूदास भावे यांच्यापूर्वीही नाटके होत होती. परंतु या नाटकाचा व्यवसाय होऊ शकतो, हे विष्णुदास भावे यांनी दाखवून दिले, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. ५ नोव्हेंबर या रंगभूमी दिनी आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानीत करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना गौरव पदक प्रदान करण्यात आले.

सांगलीतील भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, नाट्य परिषदेतील वाद मिटावेत आणि लवकर नाट्य संमेलन व्हावे. १०० व्या नाट्य संमेलनाचे साचलेले पाणी प्रवाही करावे आणि लवकरात लवकर नाट्य संमेलनाचे आयोजन करावे, अशी मागणी आळेकर यांनी जब्बार पटेल यांच्याकडे केली.

आळेकर म्हणाले, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, भावे गौरव पदक हा पुरस्कार अत्यंत जवळचा वाटतो. हा पुरस्कार म्हणजे रंगभूमीचा प्रसादच आहे. नाटक ही प्रवाही गोष्ट आहे. नाटकातून कोणत्याही प्रकारचा प्रचार दिसला की प्रेक्षक दुरावतो. माझ्या नाटकाचे कमी प्रयोग झाले, तरीही प्रेक्षकांना ती बघावीशी वाटली. त्यांनी माझी नाटके समजून घेतली. माझ्या नाटकांची त्यांनी कधी टिंगल, चेष्टा केली नाही. कोणत्याही नाटकाची चेष्टा करुन परंपरा कायम राहात नाही. त्यामुळे एकाच नाटकाचे प्रयोग त्याच ताकदीने होतील, असे नाही. त्यामध्ये सतत मोडतोड, पुनर्जुळणी सुरु असते, असे आळेकर म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या