22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक एसटी विभागाला पंढरीचा विठ्ठल पावला

नाशिक एसटी विभागाला पंढरीचा विठ्ठल पावला

एकमत ऑनलाईन

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाद्वारे पुरवण्यात आलेल्या बससेवेचा हजारो वारक-यांनी लाभ घेतला. जिल्ह्यातील ५४ हजार भाविकांनी पंढरपूरपर्यंतचा प्रवास केला. यातून एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरीची वारी बंद होती. त्यामुळे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकले नव्हते. मात्र, यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने पंढरीच्या वारीला लाखो भाविक गेले होते. या पंढरीच्या वारीसाठी नाशिक जिल्ह्यातून २२७ विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेमुळे पंढरीचा विठ्ठल नाशिक विभागाला पावला असून तब्बल ९५ लाखांचे उत्पन्न झाले आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे लालपरी आगारात बंद होती. त्यानंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेल्याने अनेक महिने कोरोना आटोक्यात आल्यानंतर बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

मात्र कोरोना संसर्गाचा धोका आटोक्यात आल्याने यंदा त्र्यंबकेश्वरहून गेलेल्या पालखी सोहळ्याला वारक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर अनेकांना वारीतून चालत जाणे शक्य नसल्याने अनेक वारकरी बसने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने भाविकांसाठी मुबलक संख्येने बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या