27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रपदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी आज मतदान !

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी आज मतदान !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ३०(प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी उद्या एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत होत असून विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच महाविकास आघाडी व भाजप असा सामना असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात तसेच नागपूर व औरंगाबाद पदवीधर व अमरावती शिक्षक मतदारसंघ अशा पाच मतदारसंघात १ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा थेट सामना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे. महाविका आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या एकत्रित प्रचार केला असून भाजपनेही आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

विराटची पितृत्वरजा : गैर काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या