34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeमहाराष्ट्रपदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान करुन घेण्यात आल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर आली आहे.

राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली.
पुणे पदवीधर मतदारसंघात ४ वाजेपर्यंत ५२.६९ टक्के तर शिक्षक मतदार संघात ७६.६९ टक्के मतदान झाले होते. नागपूर पदवीधर मतदारसंघात दुपारी ४ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात दुपारी ४ पर्यंत ६८.६५ टक्के मतदान झाले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात परभणीत ४ वाजेपर्यंत 4 ५८.६३ टक्के मतदान झाले.

महाविकास आघाडीकडून अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांड देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण तर नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. तर भाजपकडून अमरावती शिक्षक मतदारसंघात डॉ. नितीन धांडे, पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख, पुणे शिक्षक मतदारसंघात जितेंद्र पवार, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर व नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. निकला ३ डिसेंबरला लागणार आहे.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर येथील तरुण रेल्वे कर्मचाऱ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या