मुंबई : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे.
विधान परिषदेसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झाले आहे. ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक उमेदवाराला ंिजकण्यासाठी प्रत्येकी २६ मतांची गरज आहे.
विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे
भाजपा – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना – आमश्या पाडवी, सचिन अहिर
राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप