27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रवानखेडेंची मलिकांविरोधात तक्रार

वानखेडेंची मलिकांविरोधात तक्रार

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वादाचा नवा अंक आता पाहायला मिळणार आहे. समीर वानखेडे यांनी जात पडताळणी समितीकडून दिलासा मिळाल्यानंतर नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी समीर वानखेडे यांनी केली होती. त्याप्रमाणे नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांना जात वैधता तपासणी समितीनं क्लीनचीट दिल्यानंतर त्यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीने ते मुस्लीम नसल्याचे म्हणत दिलासा दिला होता. समीर वानखेडेंनी यानंतर नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार समीर वानखेडेंच्या मागणीवरुन गोरेगाव पोलिसांनी ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

समीर वानखेडे यामध्ये तक्रारदार आहेत. पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून केला जाणार आहे. जात पडताळणी समितीकडे चार जणांनी वानखेडेंच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये नवाब मलिक यांचा समावेश होता. आता गोरेगाव पोलीस नवाब मलिक यांच्या कोठडीची मागणी करणार का हे येणा-या काळात स्पष्ट होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या