25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रवरंध घाट ३ महिने वाहतुकीसाठी बंद

वरंध घाट ३ महिने वाहतुकीसाठी बंद

एकमत ऑनलाईन

रायगड : सध्या राज्यातील काही भागात मुसळधार पावसामुळे ब-याच घाटांत दरडी कोसळत आहेत. महाड-पुणे मार्गावरील वरंध घाट धोकादायक ठरत आहे. येथे दरड कोसळल्यानंतर वरंध घाट आजपासून तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद ठेण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वरंध घाटात सातत्याने दरड रस्त्यावर खाली येत आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड-भोर, पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, असा आदेश रायगड जिल्हाधिका-यांनी बजावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या