24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

मुंबईत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आणि भाजपच्यादृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात आरक्षित प्रभागांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यावेळी मुंबईतील अनेक प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे.

अनुसूचित जाती आणि महिला आरक्षणामुळे वर्षानुवर्षे निवडून येत असलेल्या नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागले आहेत. सर्वच पक्षांमधील नगरसेवकांना या रचनेचा फटका बसला आहे. त्यामुळे आता संबंधित आरक्षित वॉर्डमध्ये नवे उमेदवार शोधणे आणि प्रस्थापित नगरसेवकांसाठी दुसरा प्रभाग शोधणे, अशी दुहेरी कसरत राजकीय पक्षांना करावी लागणार आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांना यंदा आपला प्रभाग सोडावा लागणार आहे. अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर आशिष चेंबूरकर यांचा प्रभाग अनुसूचित वर्गासाठी आरक्षित झाला आहे.

याशिवाय, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांचा वॉर्ड क्रमांक ११७ हा देखील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर मुंबईचे माजी महापौर यांनाही त्यांचा प्रभाग क्रमांक ९६ महिला आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळे आता या सगळ्या नेत्यांना संबंधित पक्ष दुस-या कोणत्या प्रभागातून उमेदवारी देणार, हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या